प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

संप कराल तर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला असला तरी सोमवारी काम बंद आंदोलन करणारच असा निर्धार डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील अपघात विभागातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई (Mumbai).  संप कराल तर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला असला तरी सोमवारी काम बंद आंदोलन करणारच असा निर्धार डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील अपघात विभागातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक वर्षांपासून असलेल्या प्रलंबित मागण्या आणि १२० दिवसांचीच सेवा, रूगणालयातील पदे नियमित असूनही अदयापही सहावा वेतन आयोगच लागू आहे. त्यामुळे वैदयकिय अधिकाऱ्यांना कायम सेवेत सामावून त्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी सरकारकडे सातत्‍याने पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन देण्यात येत आहे. आपल्या मागणीकडे सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी शासकीय वैदयकिय महाविदयालय व रूग्‍णालयातील वैदयकिय अधिकारी यांनी १ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत काळया फिती लावून काम केले.

मात्र सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने डॉक्टरांनी एक दिवस काम बंद आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी 8 ते मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अपघात विभाग आणि अन्य प्रशासकीय कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वैदयकिय महाविदयालय वैदयकिय अधिकारी संघटनेचे डॉ. रेवत कानिंदे यांनी दिली.