कोरोना काय फक्त रात्रीच फिरतो का? ठाकरे सरकाच्या नाईट कर्फ्यूनंतर मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचे कारण काय आहे?” असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे विचारले उपस्थित केले आहेत.  तुमची नाइट लाइफ ती नाइट लाइफ आणि जनतेची पार्टी 'करो'ना, असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत आहे” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना टार्गेट केले.

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या रात्रीच्या संचारबंदीवर मनसेने हल्लाबोल केला आहे.

कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचे कारण काय आहे?” असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे विचारले उपस्थित केले आहेत.

तुमची नाइट लाइफ ती नाइट लाइफ आणि जनतेची पार्टी ‘करो’ना, असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

“तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत आहे” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना टार्गेट केले.

लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाल्याने हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर मग अमेरिकेसारखे पॅकेजही द्या” अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली आहे.