पतंजलीच्या रामदेवबाबांकडे आयुर्वेदिक, मेडिकल कौन्सिलची पदवी आहे का? राष्ट्रवादीचा सवाल

ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही तो उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विना पदवीचा कुणी डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मलिक  यांनी केली आहे.  ते म्हणाले की, रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देऊ शकतात

  मुंबई : केवळ आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी कुणा व्यक्तीला आरोग्य सल्ला देता येणार नाही अशी वक्तव्य पतंजलीचे रामदेव बाबा करत असतील तर हे चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी चे प्रवक्ता नबाब मलिक यानी रामदेव बाबा यांच्या कामाला हरकत घेतली आहे.  ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  विना पदवीचा कुणी डॉक्टर बनत नाही

  ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही तो उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विना पदवीचा कुणी डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मलिक  यांनी केली आहे.  ते म्हणाले की, रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देऊ शकतात.

  मात्र, आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे, असे मलिक यांनी म्हटले. केंद्रीय आरोग्य विभागाने रामदेवबाबा यांचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पध्दतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था तयार करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.

  उत्पादनाच्या उद्घाटनासाठी आरोग्य मंत्री जातात

  रामदेवबाबा डॉक्टर नाही. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री घेतलेली नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काही विधाने करत आहेत. अलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत आहेत. रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात त्यापेक्षा दुर्दैवी घटना होवू शकत नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. देशाच्या संविधानात वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास, अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक असल्याचेही त्यांनी म्हटले.