फोटो सेशनसाठी काम करीत नाही; भाजप नेत्यांना आदित्य ठाकरेंचे सडेतोड प्रत्युत्तर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना आणि चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेले असतानाही मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पाहणी करायला आले नाही, अशी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आदित्य ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना आणि चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेले असतानाही मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पाहणी करायला आले नाही, अशी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आदित्य ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

    मी जरी पर्यटनमंत्री असलो तरी पर्यटन करण्याची मला हौस नाही. काही लोक फोटो काढण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी देतात. आमचा हेतू लोकांना मदत करण्याचा आहे आणि आम्ही मदत करीत असल्याने विरोधक निराश झाले आहेत. त्यामुळे त्यांनी टीका करत राहावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.