Donate blood; Get a kilo of chicken for free! Unique offer in Aditya Thackeray's constituency

मुंबई : राज्यात कोरोनाच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असं आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात चक्क रक्तदानासाठी आगळीवेगळी ऑफर ठेवण्यात आली आहे. या ऑफरमुळे रक्तदान करण्याकरीता नागरिक नक्कीच पुढे येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

प्रत्येक रक्तदात्यास एक किलो चिकन मोफत देण्यात येईल. तर, शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल. अशी ऑफर नगरसेवक आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य समाधान सदा सरवणकर यांनी दिली आहे.