कोरोनाविरोधात दात्यांची भरभरून मदत, राज्य सरकारला पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायजरचा पुरवठा

मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यभरातून विविध संस्था, कंपन्या आणि दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हस्ते मदत करत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारला विविध कंपन्याकडून मिळालेल्या

 मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यभरातून विविध संस्था, कंपन्या आणि दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हस्ते मदत करत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारला विविध कंपन्याकडून मिळालेल्या मिळालेल्या साहित्यामध्ये १३ हजार पीपीई किट, २,९०,५७८ एन ९५ मास्क, ४१, ६०० ग्लोव्हज, ४८ व्हेंटिलेटर, यासह प्रोटेक्टिव्ह क्लॉथ किट, सिरिंज पम्प, सॅनिटायझर, गॉगल यांचा समावेश आहे. 

विशेष म्हणजे हे साहित्य जिल्ह्यांच्या मागणीनुसार तातडीने पाठवण्यातही आले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक कंपन्यांना त्यांच्या सीएसआर निधीतून आवश्यक वैद्यकीय उपकरणे देण्याचे आवाहन केले होते. त्याला राज्यातील अनेक कंपन्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्य सरकारला मदतीचा हातही पुढे केला. विविध कंपन्या, संस्था, व्यक्ती आणि आस्थापना यांच्याकडून येणारी मदत हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हाफकिनकडून सर्व कंपन्यांकडून येणारी वैद्यकीय सहित्य, उपकरणे गेल्या महिनाभरापासून जमा करण्यात येत आहेत.

यामध्ये १३ हजार पीपीई किट, २,९०,५७८ एन ९५ मास्क, ४१, ६०० ग्लोव्हज, ४८ व्हेंटिलेटर,  ८,८५,३९० थ्री प्लाय मास्क,  १००० पॉटेक्टिव्ह क्लॉथ किट,  १० प्लस ऑक्सिमीटर फिंगर यासारखी महत्वाची उपकरणे व साहित्यांचा समावेश आहे. 

एल अँड टी इंडस्ट्रीज लिमिटेड, हिकल लिमिटेड, अमेरिकेअर फाउंडेशन, हुंदाई मोटर्स, सिमेन्स लिमिटेड, रिलायन्स जिओ, टेक महिंद्रा, गोदरेज इंडस्ट्रीज, रोटरी क्लब, डेटॉल, एचडीएफसी लिमिटेड या सारख्या अनेक कंपन्यानी आपल्या सीएसआर निधीतून तर मेथीबाई देवराज गुंडेचा फाउंडेशन, पिरामल स्वास्थ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या समाजिक संसथानी मोठ्या प्रमाणात आवश्यक साधने व उपकरणे राज्य सरकारला उपलब्ध करून दिले  आहे.  अमेरिकेअर इंडिया फाउंडेशन आणि रिलायन्स जिओने या मदतीमध्ये मोठा वाटा उचलला आहे. 

राज्य सरकारला विविध कंपन्या आणि संस्थांकडून आलेली उपकरणे आणि साहित्य तातडीने जिल्ह्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

सरकारने केलेल्या आवाहनाला दात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दात्यांकडून रात्री-अपरात्री येणारे साहित्य गाड्यांमधून उतरवण्यापासून त्याची नोंद करेपर्यंत सर्व कामे हाफकिनचे कर्मचारी व अधिकारी दिवसरात्र करत आहेत.

हाफकिनचे कर्मचारी २४ तास मेहनत घेत आहेत. तसेच त्यानंतर वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्या सल्ल्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांना हे साहित्य वितरित करण्यात येत आहे.  – डॉ. राजेश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ

सी.एस.आरच्या माध्यमातून मिळालेले साहित्य 

पीपीई किट – १३,०८९

सॅनिटायझर – ६१, १२७ लिटर 

एन ९५ मास्क – २,९०,५७८

एफएफपी २ मास्क  – २४,३००

एफएफपी ३ मास्क – ८,५०० 

३ प्लाय मास्क – ८,८५,३९०

डेटॉल साबण – ३,००,००

पॉटेक्टिव्ह क्लॉथ – ४९, २३४ (सिंगल सूट)

सर्जिकल कॅप – २२५०

गॉगल – ३४२८०

मल्टी पॅरा मॉनिटर – ६३

शू कव्हर – २५००

प्लस ऑक्सिमीटर टेबल  – १०

सिरिंज पम्प -१००

बेड -१२५

हेलियम डार्क मॅट्रेस – ३७