Mahavikas Aghadi government once again made administrative changes; Lokesh Chandra as General Manager of BEST

गेल्या काही दिवसांपासून विविध समाजमाध्यमांवर एका लाल रंगाच्या मोटार कार वर बेस्ट उपक्रमाचा लोगो तसेच ' बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी ' असा उल्लेख आणि त्यासोबत चालकाचा गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. पण बेस्ट उपक्रमाने ही मोटार कार बेस्ट सुरू करणार नसल्याचे जाहीर करून या फोटोवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध समाजमाध्यमांवर एका लाल रंगाच्या मोटार कार वर बेस्ट उपक्रमाचा लोगो तसेच ‘ बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी ‘ असा उल्लेख आणि त्यासोबत चालकाचा गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. पण बेस्ट उपक्रमाने ही मोटार कार बेस्ट सुरू करणार नसल्याचे जाहीर करून या फोटोवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

    या व्हायरल फोटोमुळे मुंबईकर आणि बेस्ट प्रवासी यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेस्ट उपक्रमाने खरोखरच अशा प्रकारची टॅक्सी सेवा सुरु केली आहे का? किंवा भविष्यकाळात सुरु करण्याचा विचार आहे का? अशा प्रकारचे विविध गैरसमज या फोटोमुळे निर्माण झालेले आहेत.

    पण अशा प्रकारची कोणतीही टॅक्सी सेवा बेस्ट उपक्रमाद्वारे सुरु करण्यात आलेली नसून नजिकच्या काळात तशा प्रकारची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे मुंबईकर बेस्ट प्रवासी यांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही फोटोवर किंवा मजकुरावर विश्वास ठेवू नये,असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.