prakash-ambedkar-administrative-challenges-after-covid

काल नवी मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत आरक्षण होईलपर्यंत एमपीएससी परीक्षा घेऊ नका, अन्यथा परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामंजस्य बिघडवू नका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी छत्रपती संभाजीराजे यांना दिला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टात (SC) स्थगिती दिल्यानंतर, राज्यात महाविकास आघआडी सरकारने घेतलेल्या नोकरभरतीच्या निर्णयाला खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी विरोध केला आहे. त्याचबरोबर सर्व मराठा संघटनांना एकत्र घेऊन या विषयाबाबत सरकारवर दबाव करण्याचे काम सध्या छत्रपती संभाजीराजे करीत आहेत.

ईडब्ल्यूएसच्या कोट्यातून १० टक्के आरक्षणात मराठा समाजाला स्थान नको, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. काल नवी मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत आरक्षण होईलपर्यंत एमपीएससी परीक्षा घेऊ नका, अन्यथा परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामंजस्य बिघडवू नका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी छत्रपती संभाजीराजे यांना दिला आहे.

मराठा आरक्षणाला वंचित बहुजन पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, असे मतही त्यांनी मांडले. या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी दोन्ही छत्रपतींवर टीका केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांचे लक्ष दुसरीकडेच आहे, असे सांगत त्यांनी संभाजीराजेंवर टीका केली आहे. यावेळी नाव न घेता त्यांनी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरही टीका केली आहे.