Narayan Rane says about the ED inquiry of Sanjay Raut's wife

संसदेत भेटल्यावर मी तुमच्यासोबत आहे, असे खासदार संजय राऊत समोरासमोर बोलतात; मात्र माझ्यावर अपरोक्ष टीका करतात. कोणी कोणावर टीका करावी याचे भान राऊतांनी ठेवावे. उगाच माझ्या फंदात पडू नये, असा सल्लावजा इशारा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राऊत यांना दिला. शेवटच्या दिवशी राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दोडामार्ग पिंपळेश्वर सभागृहात आली. तेथे तालुकावासीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यावेळी राणे बोलत होते.

    मुंबई : संसदेत भेटल्यावर मी तुमच्यासोबत आहे, असे खासदार संजय राऊत समोरासमोर बोलतात; मात्र माझ्यावर अपरोक्ष टीका करतात. कोणी कोणावर टीका करावी याचे भान राऊतांनी ठेवावे. उगाच माझ्या फंदात पडू नये, असा सल्लावजा इशारा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राऊत यांना दिला. शेवटच्या दिवशी राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दोडामार्ग पिंपळेश्वर सभागृहात आली. तेथे तालुकावासीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यावेळी राणे बोलत होते.

    मंत्री राणे म्हणाले, दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी आपण उद्योगमंत्री असताना आडाळी येथे एमआयडीसी अस्तित्वात आली; मात्र गेली सात वर्षे सत्तेत असलेल्या स्थानिक आमदार केसरकर यांनी एक दगड तरी ठेवला का, अशा कुचकामी आमदाराला पुनश्च निवडून देऊ नका अशी टीका करत उद्योगमंत्री सुभाष देसाई उद्योग बंद करतात.

    रोजगार उपलब्ध करण्याचे सोडून जमिनी विकणारे हे बिनकामी सरकार जनतेचे भले तरी काय करणार ? जनआशीर्वाद यात्रेदरम्यान माझ्याप्रती असलेले दोडामार्गवासीयांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. कोणत्या जन्मीचे पुण्य मला लाभले की एवढे प्रेम माझ्यावर माझे बांधव करीत आहेत. त्यांचे उपकार मी फेडू शकत नाही. माझ्याकडे असलेल्या केंद्रीय मंत्रिपदाचा पुरेपूर फायदा माझ्या कोकणासाठी करणार आहे, असे राणे म्हणाले.