अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका – महानगरपालिकेचे आवाहन

  • मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमिवर आज सोमवार ४ ऑगस्टला मुंबई महानगरपालिकेने सर्व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपापल्या घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आवश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नये अशा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे.

मुंबई : मुंबईमध्ये काल रात्री पासुन मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पढील १४ तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमिवर आज सोमवार ४ ऑगस्टला मुंबई महानगरपालिकेने सर्व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपापल्या घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आवश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नये अशा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. 

मुंबईत काल रविवारपासून कोसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तवल्यानुसार पावसाचा जोर कायम राहिला आहे. मुंबईतील बहुतांश भागात पाणी साचल्याने पुराचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मुंबईतील मिठी नदी दुथडी भरून वाहत आहे. सखल भागात पाणी भरल्याने मुंबई महानगरपालिकेने आज सर्व नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना पाणी भरलेल्या भागापासून लांब राहण्याचे सांगितले आहे. 

अरबी समुद्रामध्ये पूर्व-मध्यावर किनारपट्टीच्या उत्तरेस चक्रवाती वर्तुळकार परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुबईतील समुद्रात भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्र किनारुपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ४ ते ५ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहेत.