लैंगिक अत्याचारातील आरोपींना जामीन देऊ नका : चित्रा वाघ

भाजप महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडी महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही तसेच महिला सुरक्षबाबत सरकार अपयशी ठरले आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या आरोपींना जामीन मिळत आहेत. हे जामीन कोणत्या अटीं-शर्थींवर जामीन मिळत आहे. याबाबत चौकशी व्हायला हवी. असे चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

मुंबई : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे राज्य लॉकडाऊन असतानाही लैंगिक अत्याचारातील आरोपींना जामीन दिला जाऊ नये. अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच त्या आरोपींचे जामीन रद्द करावे यासाठी राज्य शासन आणि पोलीसांनी न्यालयाला विनंती करावी असी मागणी केली आहे. 

भाजप महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडी महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही तसेच महिला सुरक्षबाबत सरकार अपयशी ठरले आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या आरोपींना जामीन मिळत आहेत. हे जामीन कोणत्या अटीं-शर्थींवर जामीन मिळत आहे. याबाबत चौकशी व्हायला हवी. असे चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 

गृहराज्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी दिशा कायदा करण्याचे घोषणा केली आहे. दिशा कायद्याचे जनतेला स्वप्न दाखविले का. आम्ही दिशा कायद्याची वाट पाहत आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. राज्य सरकार महिला सुरक्षेबाबत अनुकूल दिसत आहे. सरकार कोरोना काळाचे कारण देत दिशा कायद्याला विलंब करत असल्याचे चित्र दिसत आहे. सर्व प्रकारचे शासन निर्णय घेत असताना महिला सुरक्षेबाबतचा निर्णय घ्यालया उशीर का करत आहे. आसा प्रश्न चित्रा वाघ यांनी सरकारला केला आहे. सरकार जोपर्यंत महिला सुरक्षेबाबत कठोर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत महिला अत्याचारांचे प्रमाण वाढतच राहील असे चित्रा वाघ म्हणाल्या.