पालिकेतील सभा प्रत्यक्ष घ्यावा ऑनलाइन सभा नकोच…

राज्यात करोनाची स्थितील लक्षात घेउन नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकांच्या सभा प्रत्यक्ष न घेता ऑनलाइन घेण्याच्या आदेशाची अमलबजावणी केली जात आहे. आता करोनाची तीव्रता कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथील केले आहेत. तसेच, दोन मात्रा घेतलेल्यांना लोकलचा प्रवासासह विमानसेवाही सुरू झाली आहेत.

    मुंबई – मुंबई महापालिकेच्या सभा, स्थायी समितीसह वैधानिक, विशेष समित्यांच्या बैठका ऑनलाइन घेण्ण्यात येत आहेत. सध्या, करोनाचा प्रादूर्भाव कमी झाला जनजीवन सुरळीत होत असतानाच लोकप्रतिनिधींवरील निर्बंध संपुष्टात आणावेत. त्याचप्रमाणे पालिकेतील सभा, बैठकी ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष कामकाज व्हावे, अशी मागणी भाजप आणि समाजवादी पक्षाने केली आहे.

    राज्यात करोनाची स्थितील लक्षात घेउन नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकांच्या सभा प्रत्यक्ष न घेता ऑनलाइन घेण्याच्या आदेशाची अमलबजावणी केली जात आहे. आता करोनाची तीव्रता कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथील केले आहेत. तसेच, दोन मात्रा घेतलेल्यांना लोकलचा प्रवासासह विमानसेवाही सुरू झाली आहेत.

    पालिकेतील सभा, समित्यांच्या बैठका ऑनलाइन घेताना लोकप्रतिनिधींना म्हणणे मांडण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे समित्यांचे कामकाज पूर्वीप्रमाणे थेट घेण्यात यावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार-नगरसेवक रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

    भाजपनेही ऑनलाइन बैठकांऐवजी प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याची मागणी उचलून धरली आहे. लोकसभेचे कामकाजही प्रत्यक्ष होत आहे. मुंबईतील इतर निर्बंध कमी झाले असून नियमित स्वरुपात जनजीवन सुरू आहे. पालिकेच्या ऑनलाइन बैठकांमध्ये सदस्यांनी मांडलेली मते ऐकू येत नाहीत. तसेच, प्रतिध्वनी ऐकू येत असून नगरसेवकांना त्यांच्या विभागातील तक्रारीही मांडता येत नाहीत. या परिस्थितीत ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष बैठका घेण्याची मागणी भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.