sanjay raut-shevsena leader uddhav thackeray

मुंबई महानगरपालिकेने नोटीसची २४ तासांची मुदत संपल्यानंतर पालिकेनं आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली. कार्यालयावर हातोडा चालवला. हिमाचल प्रदेशातून कंगना मुंबईकडे रवाना झाली आहे. कंगना थोड्याच वेळात मुंबत दाखल होणार आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) आणि शिवसेना आमदार यांच्यातील शाब्दिक चकमकींचा वादात रुपांतर झाले आहे. कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे.(Kangana’s office)  मंगळवारी मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस (Notice) लावली होती. या नोटीसमध्ये कार्यालयात अनधिकृत बंधकाम झाल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच मनपाने २४ तासांची नोटीस बजावली होती.

मुंबई महानगरपालिकेने नोटीसची २४ तासांची मुदत संपल्यानंतर पालिकेनं आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली. कार्यालयावर हातोडा चालवला. हिमाचल प्रदेशातून कंगना मुंबईकडे रवाना झाली आहे. कंगना थोड्याच वेळात मुंबत दाखल होणार आहे.

या वादावर कंगनाच्या वक्तव्यावर तसेच कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर कोणतेही वक्तव्य करु नये असा आदेश शिवसेना नेतृत्वाने पक्षातील सर्व प्रवक्त्यांना दिला आहे. तसेच कंगनाला जास्त महत्त्व देण्यात येऊ नये. तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कंगनाच्या विधानावर कोणतेही वक्तव्य करु नये असे आदेश देण्यात आले आहे.