तुम्ही वाट्टेल ते लिहिणार त्यावर रोषही व्यक्त करायचा नाही का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना भवनासमोर जे झालं ते क्लेशदायक आहे. एका खुर्चीपायी हे होणं हे क्लेशदायक आहे, असं सांगतानाच तुम्ही रोज सामानातून वाट्टेल ते लिहिणार, जे लिहिता त्याला आधारही नसतो. त्यावर निदर्शने करायची नाही का? रोषही व्यक्त करायचा नाही का?, असा सवाल पाटील यांनी केला.

    पुणे: मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही वाट्टेल ते लिहिणार त्यावर रोषही व्यक्त करायचा नाही का? असा सवाल करतानाच या देशात लोकशाही आहे. दंडुकेशाही चालणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ठणकावलं आहे.

    चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना भवनासमोर जे झालं ते क्लेशदायक आहे. एका खुर्चीपायी हे होणं हे क्लेशदायक आहे, असं सांगतानाच तुम्ही रोज सामानातून वाट्टेल ते लिहिणार, जे लिहिता त्याला आधारही नसतो. त्यावर निदर्शने करायची नाही का? रोषही व्यक्त करायचा नाही का?, असा सवाल पाटील यांनी केला. काल झालेला राडा हा मुंबई महापालिकेची तयारी वैगरे नव्हती, तो भावनिक प्रश्न होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.