प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनामुळे अनेकजण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळतात. त्यामुळे अनेक शक्य असलेली कामे मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने केली जातात. ऑनलाईन शॉपिंगपासून ते बँकिंग ट्रान्झेक्शनपर्यंत अनेक कामे अ‍ॅपच्या माध्यमातून सहज करता येतात. पण देशात ज्याप्रमाणात ऑनलाईन प्रणालीचा वापर वाढतो आहे, त्याच वेगात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाणही वाढते आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांकडे फसवणूक करण्याचे पर्याय वाढत आहेत. अनेक सामान्यांना या सायबर फ्रॉडचा फटकाही बसतो आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मुंबई (Mumbai).  कोरोनामुळे अनेकजण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळतात. त्यामुळे अनेक शक्य असलेली कामे मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने केली जातात. ऑनलाईन शॉपिंगपासून ते बँकिंग ट्रान्झेक्शनपर्यंत अनेक कामे अ‍ॅपच्या माध्यमातून सहज करता येतात. पण देशात ज्याप्रमाणात ऑनलाईन प्रणालीचा वापर वाढतो आहे, त्याच वेगात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाणही वाढते आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांकडे फसवणूक करण्याचे पर्याय वाढत आहेत. अनेक सामान्यांना या सायबर फ्रॉडचा फटकाही बसतो आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

खोटे बँकिंग अ‍ॅप
अनेकजण बँकिंग अ‍ॅपच्या मदतीने ऑनलाईन ट्रान्झेक्शन करतात. परंतु सध्या गुगल प्ले स्टोरवर अनेक मोठ्या, प्रसिद्ध बँकांचे खोटे-बनावट अ‍ॅप उपलब्ध आहेत. चुकूनही असे अ‍ॅप डाउनलोड केल्यास खात्यातून पैसे खाली होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही बँकेचे अ‍ॅप डाउनलोड करताना, संपूर्ण सावधगिरी बाळगून, योग्य ती पडताळणी करूनच डाउनलोड करा. कोणत्याही बँकेचे अ‍ॅप डाउनलोड केल्यास, त्यात दिलेल्या अटी-शर्ती बारकाईने वाचा. यात काही चुकीचे आढळल्यास, ते अ‍ॅप खोटे असू शकते.

ऑनलाईन शॉपिंग
ऑनलाईन शॉपिंग करताना, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सायबर आरोपी अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने, अतिशय मिळत्या-जुळत्या वेबसाईट बनवतात. चुकून एखाद्या अशा बनावट साईटवरून खरेदी करून, ऑनलाईन पेमेंट केल्यास मोठ्या फसवणुकीची शक्यता आहे. त्यामुळे कधीही शॉपिंग करताना विश्वसनीय साईटचाच वापर करा.

गरज नसताना डाउनलोड करू नका
ज्या मोबाईल अ‍ॅपची आवश्यकता नाही, ते अ‍ॅप मोबाईलमध्ये स्टोर करून ठेऊ नका. अनेकदा अ‍ॅप डाउनलोड करताना, त्यासोबत मालवेयरही डाउनलोड होतो. त्यामुळे तुमची खासगी माहिती सायबर आरोपींकडे सहजपणे पोहचू शकते. त्यामुळे नको असलेले अ‍ॅप मोबाईलमध्ये ठेऊ नका.