डॉ. भारती गोरे यांना ‘स्त्री शक्ती सन्मान‘ प्रदान; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख डॉ.भारती बलभिमराज गोरे यांना ‘स्त्री शक्ती सन्मान‘ प्रदान करण्यात आला आहे. राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी  सायंकाळी राजभवनात पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला.

    मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख डॉ.भारती बलभिमराज गोरे यांना ‘स्त्री शक्ती सन्मान‘ प्रदान करण्यात आला आहे. राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी  सायंकाळी राजभवनात पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला.

    मुंबई स्थित सामाजिक व सांस्कृतिक संस्था अभियान यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी झाले. यावेळी आमदार अशिष शेलार, विनीत मित्तल आदींची उपस्थिती होती. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ.भारती गोरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेती दिव्या दत्ता (चित्रपट) , राजेश्वरी सचदेव (नाटक), सोनाली राठोड, रेवा राठोड (गायन), मैथिली अगस्ती (क्रीडा), देवकी डोईफोडे व नफीसा हुसेन (समाजकार्य) यांना गौरविण्यात आले.

    डॉ.गोरे या २० वर्षांपासून अधापन क्षेत्रात कार्यरत असून निवेदक, लेखक, संशोधक मार्गदर्शक व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. बेटावर कविता संग्रह, ज्योती पर्व अनुवाद, अधुनिक हिंदी काव्य मिमांसा यासाह विविध ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत.