Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Name Extension Day; Best wishes from Deputy Chief Minister Ajit Pawar

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्ताराच्या निर्णयाने राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम केला. प्रगत, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची सर्वांगीण विकासाच्या दिशेनं सुरु असलेली वाटचाल अधिक गतीमान केली.

विद्यापीठ नामविस्ताराच्या निर्णयप्रक्रियेत योगदान दिलेल्या मान्यवरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, प्रगत, पुरोगामी विचारांच्या समृद्ध, संपन्न, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देताना केलं आहे.