डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; आरोपी विक्रम भावेला दिलासा

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विक्रम भावेला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला. कोरोनामुळे भावेच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या दशक्रियाविधीसाठी तसेच त्यांच्याशी संबंधित बॅंकेच्या व्यावहारिक कामांसाठी पुणे जिल्ह्याबाहेर जाण्यास न्यायालयाने सशर्त परवानगी दिली.

    मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विक्रम भावेला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला. कोरोनामुळे भावेच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या दशक्रियाविधीसाठी तसेच त्यांच्याशी संबंधित बॅंकेच्या व्यावहारिक कामांसाठी पुणे जिल्ह्याबाहेर जाण्यास न्यायालयाने सशर्त परवानगी दिली.

    पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये अंनिसचे कार्याध्यक्ष दाभोलकरांची ओंकारेश्वर मंदीराजवळ हत्या करण्यात आली होती. आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना मदत केल्याप्रकरणी सीबीआयने हिंदू विधिज्ञ परिषदेत काम कऱणाऱ्या तसेच सनातन सस्थेचा सदस्य असलेल्या विक्रम भावेला अटक केली होती.

    या आधी 6 मे रोजी उच्च न्यायालयाने भावेला विविध अटीशर्तीसह 1 लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. तसेच पासपोर्ट सीबीआयकडे जमा करण्याचे आणि पुणे एनआयए विशेष न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मज्जाव केला होता. गुरुवारी विक्रम भावे करून एक नव्याने अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.