विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या  डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सेनेच्या नीलम गोऱ्हे यांची उपसभापती एकमताने निवड झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची आज मंगळवारी निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीतून उपसभापती नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे भाजपाने भाई गिरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.परंतु मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या  डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सेनेच्या नीलम गोऱ्हे यांची उपसभापती एकमताने निवड झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे  यांच्या  निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो असेही मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करतांना म्हणाले.