drainage sfot

पालिका प्रशासनाने या कामाची अंदाजित किंमत ३ कोटी २६ लाख ७९ हजार ३६३ रुपये ठरवली होती. मात्र कंत्राटदार मे. विधी एन्टरप्रायझेस याने हे काम ३६.९६% कमी दरात करण्याची तयारी दर्शवली आहे. म्हणजेच कंत्राटदाराने हे काम २ कोटी ६१ लाख रुपयांत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या कंत्राटकामाच्या दर्जाबाबत भाजप व विरोधी पक्ष यांच्याकडून विरोध दर्शविला जाऊ शकतो.

    मुंबई – मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी खात्याच्या प्रमुख अभियंत्यांनी पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप व मुलुंड या विभागातील मोडकळीस आलेल्या नाल्यांची दुरुस्तीची कामे, बांधणी, पुनर्बांधणी इत्यादी कामांसाठी मे. विधी एन्टरप्रायझेस या कंत्राटदाराची नेमणूक एका वर्षासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे काम ३७ टक्के कमी दराने दिल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

    पालिका प्रशासनाने या कामाची अंदाजित किंमत ३ कोटी २६ लाख ७९ हजार ३६३ रुपये ठरवली होती. मात्र कंत्राटदार मे. विधी एन्टरप्रायझेस याने हे काम ३६.९६% कमी दरात करण्याची तयारी दर्शवली आहे. म्हणजेच कंत्राटदाराने हे काम २ कोटी ६१ लाख रुपयांत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या कंत्राटकामाच्या दर्जाबाबत भाजप व विरोधी पक्ष यांच्याकडून विरोध दर्शविला जाऊ शकतो.

    पालिकेने या कामासाठी टेंडर काढले असता, सहा कंत्राटदारांनी त्यात सहभाग घेतला. मात्र त्यापैकी ५ कंत्राटदारांचा प्रतिसाद हा सकारात्मक ठरला. या ५ कंत्राटदारांनी या कामांसाठी किमान २६.७५% ते किमान ३६.९६% इतके कमी दर भरले होते. मात्र मे. विधी एन्टरप्रायझेस या कंत्राटदाराने सर्वात कमी टक्केवारीत म्हणजे ३६.९६% एवढ्या कमी दरात हे काम करण्याचा दावा केला आहे.

    कमी दराने काम करणार्या या कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जाविषयी पालिका वर्तूळात चर्चा सुरू झाली आहे. पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप व मुलुंड या विभागातील मोडकळीस आलेल्या नाल्यांची दुरुस्तीची कामे, बांधणी, पुनर्बांधणी आदी कामे हाेतील की नाही याबाबत आता विराेधी पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत.