ड्रीम मॉलच्या प्रशासकाला अटक होणार? पोलिसांच्या हाती लागली अग्निशमन दलाची काही महत्त्वाची कागदपत्रे

मुंबईमधील ड्रीम मॉलमध्ये मार्च महिन्यात लागलेल्या आगीत सनराईस हॉस्पिटलमधील 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याचदरम्यान पोलिसांच्या हाती अग्निशमन दलाची काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. ज्यामुळे मॉलचे प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

    मुंबई : मुंबईमधील ड्रीम मॉलमध्ये मार्च महिन्यात लागलेल्या आगीत सनराईस हॉस्पिटलमधील 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याचदरम्यान पोलिसांच्या हाती अग्निशमन दलाची काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. ज्यामुळे मॉलचे प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, सहस्रबुद्धे यांनी पोलिसांची चौकशी आणि अटकेची शक्यता पाहता कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी 7 जून 2021 सुनावणी होणार आहे. भांडुप पोलिसानी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    आग लागण्याच्या 4 महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने ड्रीम मॉलचे फायर इन्स्पेक्शन करुन प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांना नोव्हेंबर 2020 मध्ये नोटीस बजावली होती.