ड्रीम्स मॉल आग दुर्घटना : २१ कोरोना रुग्ण होम क्वारंटाइन, पालिकेने दिले स्पष्टीकरण

अग्निशमन दलाने सनराइज रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या ६७ जणांची सुखरूप सुटका केली होती. यातील ४६ जणांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. तर २१ रुग्णांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र या कोरोना रुग्णांना कोणतीही लक्षणे नसून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यातील काही रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

    भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत अग्निशमन दलाने सनराइज रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या ६७ जणांची सुखरूप सुटका केली होती. यातील ४६ जणांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. तर २१ रुग्णांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र या कोरोना रुग्णांना कोणतीही लक्षणे नसून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यातील काही रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

    अग्निशमन दलाने ६७ जणांना जिवाची बाजी लावून वाचवले. मात्र वाचवण्यात आलेल्यांपैकी २१ रुग्ण बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. मात्र पालिकेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सनराइज रुग्णालयातील या २१ रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्या सर्वांचे पत्ते पालिकेकडे असून दरदिवशी त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली जात आहे. यातील काही जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर काही जणांचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.