‘Drive in’ vaccine in Mumbai; The first center in the country started in Dadar; Doses given to passengers in 250 vehicles in the parking lot

देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरण शक्यतो कोविड सेंटर, रुग्णालयांमध्ये होत आहे. पंरतु, मुंबईत देशातील पहिले ‘ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र’ सुरु करण्यात आले असून खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. दादर येथील कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, उद्घाटनापूर्वीच येथे गर्दी झाली होती. येथे दिवसाला २५० वाहनांमधील प्रवाशांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

  मुंबई : देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरण शक्यतो कोविड सेंटर, रुग्णालयांमध्ये होत आहे. पंरतु, मुंबईत देशातील पहिले ‘ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र’ सुरु करण्यात आले असून खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. दादर येथील कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, उद्घाटनापूर्वीच येथे गर्दी झाली होती. येथे दिवसाला २५० वाहनांमधील प्रवाशांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

  वाहनांमध्ये लसीकरण अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग देशात सुरु झाला आहे. मुंबईतील दादर भागात याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना अनेकदा लसीकरणासाठी रांगेत उभे राहण्यास काही अडचणी येतात. अशा सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

  या सुविधेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना हा उपक्रम उत्तम असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्घाटन होणार होते. पण, नागरिकांच्या वाहनांची रिघ पाहता इथे लसी देण्यास सुरुवात करण्यात आली. मागील तीन दिवसांपासून मुंबईत लसींच्या तुटवड्यामुळे ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. पण, आता मात्र ही मोहिम पुन्हा एकदा एका नव्या रुपाने सुरु झाली आहे. अशीच आणखी दोन- तीन केंद्र सुरु करण्याची मागणीही नागरिकांनी येथे केली.

  सर्वांकडेच वाहने असतील असे नाही, पण थेट केंद्रावर जाऊन लस घेण्यासोबत वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांनाही लस देण्याच्या या उपक्रमाचे स्वागत सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. या लसीकरण केंद्रावर सुरुवातीला नोंदणी कक्ष असून पुढे नागरिकांना ही लस मिळत आहे. आजच्या दिवसभरात येथे १५०० लसी उपलब्ध झाल्या असून यापुढे ही संख्या नेमकी कोणता आकडा गाठते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

  याठिकाणी केवळ ४५ वर्षांवरील आणि दिव्यांग नागरिकांसाठीच ही सुविधा उपलब्ध असून लवकरच १८ वर्षांवरील सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे. कोहिनुर पार्किंग लॉटमधील या केंद्रात ड्राईव्ह इन लसीकरण सुविधे व्यतिरिक्त असलेल्या ७ बूथच्या माध्यमातून दिवसाला ४ हजार नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

  दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांना सहजतेने लसीकरण करता यावे, यासाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अशाच रीतीने मुंबईतील विविध ठिकाणी मोठ्या पार्किंग लॉट मध्ये अशीच सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

  - खासदार राहुल शेवाळे