Drones will destroy malaria, dengue larvae Drone spraying on mosquito breeding grounds

या ड्रोनची टँक क्षमता दहा लिटर व बॅटरीची क्षमता अर्धा तास आहे. हा ड्रोन उडविण्यासाठी थींक केअर कंपनीची मदत घेऊन प्रशिक्षित पायलटद्वारे ड्रोन उडवला जात आहे. तसेच याव्यतिरिक्त कीटकनियंत्रण खात्यांच्या कर्मच्या-यांमार्फत विभागामध्ये एकूण ६८९ एवढे मलेरियावाहक डांस उत्पत्ति स्थाने शोधून नष्ट करण्यात आली. डासांच्या उत्पत्ती स्थानांवर फवारणी केल्याचा फायदा होत आहे.

    मुंबई : मुंबईत सर्दी, ताप असे पावसाळी आजार वाढले आहेत. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू डासांच्या उत्पत्ती स्थानांवर पालिकेकडून आता ड्रोनने फवारणी केली जाणार आहे. सोमवारी महालक्ष्मी धोबीघाट येथील मलेरिया व डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत ड्रोनद्वारे घरांच्या छतावर फवारणी करण्यात आली. यावेळी लाेअर परळ येथील जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे तसेच किटकनाशक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    मलेरिया डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी सीएसआरमधून ड्रोन खरेदी करण्यात आला असून एका ड्रोनची किंमत साडेसात लाख रुपयापर्यंत आहे. लाेअर परळ येथील जी – दक्षिण विभागात मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या मिल्स, लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीच्या वरील भागात ठेवण्यात आलेल्या ताडपत्री अश्या ठिकाणी पावसाळांमध्ये पाणी साचून मलेरिया वाहक डांसाची उत्पत्ती होत असते. या ठिकाणी पाहणी करण्याकरीता व अळीनाशक फवारणी साठी किटकनियंत्रण खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी डासउत्पत्ती होऊन मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होते. या पार्श्वभूमीवर ड्रोन खरेदी करून फवारणी केली जाते.

    जून-२०२१ पासून कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. या ड्रोनची टँक क्षमता दहा लिटर व बॅटरीची क्षमता अर्धा तास आहे. हा ड्रोन उडविण्यासाठी थींक केअर कंपनीची मदत घेऊन प्रशिक्षित पायलटद्वारे ड्रोन उडवला जात आहे. तसेच याव्यतिरिक्त कीटकनियंत्रण खात्यांच्या कर्मच्या-यांमार्फत विभागामध्ये एकूण ६८९ एवढे मलेरियावाहक डांस उत्पत्ति स्थाने शोधून नष्ट करण्यात आली. डासांच्या उत्पत्ती स्थानांवर फवारणी केल्याचा फायदा होत आहे.

    गेल्या वर्षी पावसाळ्यात जून ते ऑगस्ट २०२० मध्ये एकूण ९०० मलेरिया रुग्ण सापडले होते. यावर्षी जून ते ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये मलेरिया रुग्णांमध्ये घट होऊन एकूण ४७४ मलेरिया रुग्ण सापडले आहेत.

    कमी पैशात जास्त परिणामकारकता ड्रोन फवारणीमधून साध्य होत असल्यामुळे मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या निश्चितच कमी होण्यास मदत होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच नागरिकांनी आपल्या घरांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील शोभिवंत कुंड्यांची तावदाने, वातानुकुलित यंत्रणांमधील टाक्यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे महापौर यांनी सांगितले.