NCB LOGO

एनसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर जोगेश्वरी पूर्वेतील अमीना नगर, इदगाह मैदान मेघवाडीतील चाळीवर छापा मारला आणि परिसरातील हिस्ट्रीशीटर आरोपी अबरार खानला अटक केली. त्याच्ाी झडती घेतली असता त्याच्याजवळून ८० ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज आणि १८ लाख रोक रक्कम हस्तगत करण्यात आली. अबरारविरोधात जोगेश्वरी पोलीस ठाणे आणि सांताक्रुझमध्ये २००६ आणि २००९ मध्ये गुन्हा दाखल आहे.

    मुंबई : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) मुंबई शहरातील ड्रग्ज पॅडलर्सची पाळेमुळे उपटून टाकण्यासाठी कंबर कसली आहे. एनसीबीने रात्री उशीरा शहरातील दोन ठिकाणांवर छापा मारला. थ्री स्टार हॉटेलमध्ये चालणारा ड्रग्जचा धंदा आणि ड्रग्ज तस्करीमध्ये लहान मुलांना शामील करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.

    एनसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर जोगेश्वरी पूर्वेतील अमीना नगर, इदगाह मैदान मेघवाडीतील चाळीवर छापा मारला आणि परिसरातील हिस्ट्रीशीटर आरोपी अबरार खानला अटक केली. त्याच्ाी झडती घेतली असता त्याच्याजवळून ८० ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज आणि १८ लाख रोक रक्कम हस्तगत करण्यात आली. अबरारविरोधात जोगेश्वरी पोलीस ठाणे आणि सांताक्रुझमध्ये २००६ आणि २००९ मध्ये गुन्हा दाखल आहे.

    याचप्रकारे एनसीबीने अंधेरीतील मरोळ परिसरातील थ्री स्टार हॉटेलमध्ये छापेमारी केली. या कारवाईत एका महिला ड्रग्ज पॅडलर्सला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून एमडी ड्रग्ज ज्याची की सुमारे २० लाख रुपये किंमत आहे, इतके ड्रग्ज जप्त केले आहे. कारवाईत मरोळ नाका परिसरात राहणाऱ्या रोहन पांडे या आरोपीलाही अटक करण्यात आली.