मुंबईत ड्रग्ज पॅडलरचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज पॅडलरने बाथरूमची साफसफाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाइजॉल प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एजाजा साइको असे या पॅडलरचे नाव आहे. ड्रग्ज पॅडलरला जे. जे. रुग्णालयात भरती केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ जूनला टॉयलेटचा बहाना करून आरोपी बाथरूममध्ये गेला. तेथे त्याने लाइजॉल पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  मुंबई : एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज पॅडलरने बाथरूमची साफसफाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाइजॉल प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एजाजा साइको असे या पॅडलरचे नाव आहे. ड्रग्ज पॅडलरला जे. जे. रुग्णालयात भरती केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ जूनला टॉयलेटचा बहाना करून आरोपी बाथरूममध्ये गेला. तेथे त्याने लाइजॉल पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  दरम्यान, अमली पदार्थ विरोधी शाखेने (एनसीबी) बॉलीवुड ड्रग्ज प्रकरणात मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी केली. या कारवाई दरम्यान हरीश खान नावाच्या ड्रग पेडलरला अटक केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात ही अटक झाली आहे. वांद्रेमधून खानला ताब्यता घेतले. त्याच्यासोबत त्याचा भाऊ शाकिब खान याला देखील अटक करण्यात आली आहे.

  शाकिबवर 19 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते त्यांची सुद्धा कसून चौकशी केली. या चौकशीनंतर हरीश खान याचे नाव समोर आले होते. खान सुशांत सिंहला ड्रग्ज पोहोचवण्याचे काम करायचा. हरीश त्याच्या भाऊ शकीब खान सोबत वांद्रे परिसरात ड्रग्सचा व्यापार करत होता.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा