Drug smuggling through cakes, pastries NCB raids in Malad

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तपास यंत्रणांनी ड्रग्ज अँगलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आिण तेव्हापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अशीच एक कारवाई मालाडमध्ये करण्यात आली असून बेकरीत बनवण्यात येणाऱ्या केक आणि पेस्ट्रीत ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

  मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तपास यंत्रणांनी ड्रग्ज अँगलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आिण तेव्हापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अशीच एक कारवाई मालाडमध्ये करण्यात आली असून बेकरीत बनवण्यात येणाऱ्या केक आणि पेस्ट्रीत ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

  मुंबईत ड्रग्ज तस्करांवर पोलिसांसह एनसीबीची करडी नजर असून कारवाईचा धडका कायम आहे. त्याच अनुषंगाने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मालाडमधील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाली होती.

  लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन केक आणि पेस्ट्रीची ऑर्डर मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच लॉकडाऊनच्या काळात बेकरी सुद्धा सुरू होती. त्याच दरम्यान बेकरीत केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून पुरवठा होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मालाड परिसरातील बेकरीवर छापा टाकला.

  घटनास्थळावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. केकमध्ये ड्रग्ज भरून हायप्रोफाईल परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एनसीबीने एका महिलेसह आणखी दोघांना अटक केली आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाहीये. या प्रकरणी एनसीबीचा अधिक तपास सुरू आहे.

  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू होऊन आता वर्ष पूर्ण होत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेला ड्रग्ज अँगल आणि त्यानंतर एनसीबीची सुरू असलेली कारवाई ही अद्यापही सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अनेक मोठ-मोठ्या कारवाया करत तस्करांना गजाआड केले आहे.

  हे सुद्धा वाचा