aryan khan

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूझ सफारीवर क्रूझवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. यावेळी अनेक बड्या घरातील मुलांना ताब्यात घेतले. त्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान याचा समावेश होता. आर्यनसह अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्यावतीने सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर अतिरिक्त न्या. व्ही. व्ही पाटील यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

  मुंबई – आर्यनचा ड्रग्स पार्टी प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा करत त्याच्यावरील आरोप हे खोटे आणि हस्यास्पद असल्याचा दावा करत जामीन देण्याची मागणी आर्यनच्यावतीने कऱण्यात आली. तर एनसीबीने आपल्या युक्तिवाद करताना आर्यनच्या याचिकेवर आक्षेप घेत जामीन देऊ नये, अशी मागणी केली. यासोबत आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवरील दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे.

  मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूझ सफारीवर क्रूझवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. यावेळी अनेक बड्या घरातील मुलांना ताब्यात घेतले. त्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान याचा समावेश होता. आर्यनसह अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्यावतीने सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर अतिरिक्त न्या. व्ही. व्ही पाटील यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

  रेकॉर्ड आणि पुराव्यावरून आर्यन मागील गेल्या काही वर्षांपासून प्रतिबंधित अमली पदार्थांचा नियमित ग्राहक असून त्यासोबत असलेल्या अरबाज मर्चंटकडून ६ ग्रॅम चरस सापडले आहे. दोघेही बंदी घातलेले अमली पदार्थ वापरणार असल्याचे पंचनामामध्ये स्पष्टपणे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदारासोबत काहीही सापडले नाही हा युक्तिवाद योग्य असू शकत नाही. असे एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.

  तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत. या प्रकरणात अर्चित आणि शिवराज हे ड्रग डीलर्स आहेत. त्यामुळे या प्रकरणात देखील जामीन मंजूर केला जाऊ शकत नाही. असेही स्पष्ट करत शोविक चक्रवर्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भही सिंह यांनी न्यायालयाला दिला. आर्यनच्यावतीने उपस्थित वकिलांनी एनसीबीच्या कार्याचे कौतुक करताना आरोपही केले मात्र, एसीबी अमली पदार्थ तस्करी आणि ड्रग्सच्या गैरवापरावर उपाय शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे, याबाबत त्यांना विसर पडला असल्याचेही असे अनिल सिंह यांनी पुढे नमूद केले.

  “ड्रग्सचा तरुणांवर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही वाईट परिणाम होत आहे. ही मुले आमची भावी पिढी आहेत. संपूर्ण देश या पिढीवर अवलंबून आहे. कठोर कारवाई केल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाहीत, आपल्या स्वातंत्र्यवीरांनी अशा स्वैराचारासाठीच लढा दिला होता का? ही गांधी आणि गौतम बुद्धाची भूमी आहे याचंही भान ठेवायला हवे, तपास सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत असून कुणालाच जामीन देऊ नये, असे स्पष्ट करत आर्यनसह इतरांच्या जामीनाला विरोध करताना सिंग यांनी युक्तिवाद संपवला.

  आर्यन हा प्रकऱणातील साखळीचा एक महत्वाचा भाग आहेस त्याने ड्रग्स विकत घेतले. मात्र, सुधारण्याची संधी न देता जोपर्यत हे संपूर्ण षडयंत्र उघडकीस येत नाही, तोपर्यत त्याला कैदीत ठेऊ असे एनसीबीचे वर्तन असल्याचा युक्तिवाद आर्यनच्यावतीने बाजू मांडताना अँड. अमित देसाई यांनी केला. एक रेव्ह पार्टी सुरू होती. त्यात आर्यनला पकडण्यात आले. मात्र, आर्यनकडून काहीही हस्तगत कऱण्यात आले नाही. तसेच त्याच्या फोनमधून या रेव्ह पार्टीसंदर्भात कोणताही मेसेज सापडला नाही. त्यामुळे त्याला याप्रकऱणात जबाबदार म्हणता येणार नाही म्हणूनच त्याच्यावर कठोर अटीशर्ती लादून जामीन देण्यात यावा, असा दावाही अमित देसाईं यांनी केला.