लशींच्या तुटवड्यामुळे मुंबईकरांच्या पदरी निराशा,लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण होणे अवघड

गेल्या साेमवारपासून १८ ते ४४ वयोगटासाठी टप्प्य्टप्प्याने लसीकरण(Vaccination) सुरू केले असले तरीही केंद्रांवर अवघ्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी लसपुरवठा(Vaccine Shortage) होत नसल्याची तक्रार आहे.

    मुंबई: मुंबईत लसीकरणात(Vaccination In Mumbai) सलग दुसऱ्या दिवशी अपुऱ्या लस पुरवठ्याने खंड पडल्याने मुंबईकरांची पुन्हा एकदा निराशा(Vaccination Shortage In Mumbai) झाली. गुरुवार पाठोपाठ आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात लशींचा साठा उपलब्ध नव्हता. त्यामुळे लसींची प्रतिक्षा करून नागरिक आल्या पावली परत निघून गेले. त्यानंतर काही ठिकाणी दुपारनंतर लस साठा उपल्बध झाल्याने काही अंशी लसीकरण झाले. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचे उद्दीष्ट कसे पूर्ण हाेणार असा प्रश्न आता मुंबईकरांना पडला आहे.

    गेल्या साेमवारपासून १८ ते ४४ वयोगटासाठी टप्प्य्टप्प्याने लसीकरण सुरू केले असले तरीही केंद्रांवर अवघ्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी लसपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. गुरुवारी अनेक केंद्रांवर लससाठा पोहोचला नसल्याने हजारो मुंबईकरांना लस न घेताच परत जावे लागले. त्यानंतर, शुक्रवारी केंद्रांवर लस असेल असे वाटले हाेते. मात्र आज सकाळी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांची निराशा झाली. दुपारनंतर लशींचा साठा काही केंद्रांवर पोहोचला आणि काही प्रमाणात लसीकरण झाले. या प्रकारामुळे केंद्रांवर गाेंधळ निर्माण झाला हाेते.

    केंद्रावर आणि ऑनलाईन नोंदणीच्या पद्धतीने आधीच केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळत आहे. त्या गर्दीस नियंत्रण आणताना केंद्र कर्मचारी, पक्षाचे कार्यकर्ते, पोलीस आदी सगळ्यांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे सरसकट लसीकरण पूर्ण होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.