waterlogging in mumbai

मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. अनेक भागांमध्ये पाणी भरले आहे. घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. लोकल प्रवासही ठप्प झाला आहे.

मुंबई : मुंबईत (Mumbai ) मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांत पावसाने काल मंगळवार पासून चांगलाच जोर धरला आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मुंबईत जवळपास १८० मिनीहून अधिक पावसाची नोंद पहाटेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रसासनाकडून सर्व नागरिकांना अलर्ट (Alert) करण्यात आले आहे.

मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले (waterlogging) आहे. अनेक भागांमध्ये पाणी भरले आहे. घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते (Road) वाहतूक ठप्प झाली आहे. लोकल (Train) प्रवासही ठप्प झाला आहे.


मुसळधार पावसामुळे सध्याची स्थिती पाहता मुंबई महानगरपालिकेने आज नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. अत्यावश्यक सेवा ( essential services) वगळता इतर कामासाठी बाहेर न पडण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. तसेच खासगी कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे देखील आवाहन बीएमसीने केले आहे. नागरिकांनी फक्त आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.