fda action on honey

मागील काही महिन्यांपासून कोरोनाकाळात आयुर्वेदिक औषधे, चूर्ण आणि त्यासोबत मधाचा(honey) वापर वाढला आहे. ज्यामुळे भेसळीचे प्रमाणही वाढले असल्याचे समाेर येत आहे. आता मधामध्ये भेसळ(duplicate honey) हाेत असल्याचे उघड झाले आहे.

मुंबई: मागील काही महिन्यांपासून कोरोनाकाळात आयुर्वेदिक औषधे, चूर्ण आणि त्यासोबत मधाचा(honey) वापर वाढला आहे. ज्यामुळे भेसळीचे प्रमाणही वाढले असल्याचे समाेर येत आहे. आता मधामध्ये भेसळ(duplicate honey) हाेत असल्याचे उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईत(fda action) भेसळयुक्त मध जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत(action) तब्बल ३४ लाख रुपयांचे मध जप्त करण्यात आले असल्याचे प्रशासनानकडून सांगण्यात आले. यामुळे मधाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भायखळा पूर्वेच्या अंडर द मॅन्गो ट्री नॅचरल अँड ऑरगॅनिक प्रा.लि. या कंपनीची बुधवारी झाडाझडती करण्यात आली. यावेळी ड्रममध्ये साठवून ठेवलेले तसेच विक्रीसाठी पॅक करुन ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे मध हे कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरुन एफडीएने कारवाई केली आहे. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या मधावर कोणत्याही प्रकारचे लेबल नव्हते. तसेच हे मध एका ड्रममध्ये साठवून ठेवण्यात आले हाेते. त्या मधाच्या रिपॅक बॉटल्सवर लेबलदोष आढळून आल्याने एफडीच्या पथकाने कारवाई केली. यातील काही नमुने निरीक्षणासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. या कारवाईतून २९८८.८ किलो ग्रॅम एवढा माल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ३४ लाख ५९ हजार १२६ रुपये आहे,अशी माहिती सह आयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी दिली.

हनी (अकासिया ), हनी (युकॅलिक्टस), हनी (युकॅलिक्टस ५०० ग्रॅम, हनी (जामुन) लुज, हनी ( जामुन) ५०० ग्रॅम, हनी (मसाला) लुज, हनी (मसाला) ३२५ ग्रॅम, हनी( ऑरगॅनिक सर्टिफाईड) लूज, हनी( ऑरगॅनिक सर्टिफाईड)५०० ग्रॅम, हनी (टायगर रिजर्व) लुज, हनी (वाईल्ड फॉरेस्ट) लुज, हनी (वाईल्ड फॉरेस्ट) ५०० ग्रॅम. हे सर्व नमुने सध्या तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. तपासणी अहवाल प्राप्त होताच नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही होईल असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सागितले.