मोदी-ठाकरेंच्या बंद खोलीतील भेटीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?; मनसेचा टोला

अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी तासभर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर अर्धा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आता या चर्चेवरून विविध तर्क वितर्कांबरोबरच विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही असाच चिमटा काढला आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी तासभर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर अर्धा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आता या चर्चेवरून विविध तर्क वितर्कांबरोबरच विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही असाच चिमटा काढला आहे.

    संदिप देशपांडे यांचं ट्विट

    आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट म्हटलं आहे.

    पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यावरून प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांवरच संतापले. मोदींनाच भेटलो. मी काही नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले होते.