कोरोना कालावधीतही मध्य रेल्वेने मे महिन्यात केली ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक

एप्रिल ते मे २०२१ या काळात मध्य रेल्वेने १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी २०२० मधील याच कालावधीतील ७.५५ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत ६६.५ टक्क्यांनी जास्त आहे.

  • मध्य रेल्वेत मे २०२१ मधील लोडिंग मे २०२० (४.३३ दशलक्ष टन) लोडिंगपेक्षा ४५.९% जास्त

मुंबई : एप्रिल ते मे दरम्यान २०२१ मध्ये १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग झाली जी एप्रिल ते मे २०२० दरम्यान झालेल्या ७.५५ दशलक्ष टन लोडिंग पेक्षा ६६.५% जास्त आहे. व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) च्या निरंतर प्रयत्नामुळेच कोविड आव्हाने असूनही मध्य रेल्वेने मे २०२१ या महिन्यात मालवाहतूक लोडिंग मध्ये भर पाडली आहे.

मे २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ६.३२ दशलक्ष टन वाहतूक केली जी मे २०२० मधील ४.३३ दशलक्ष टन च्या तुलनेत ४५.९%जास्त होते. मे २०२१ मध्ये ३.५७ दशलक्ष टन कोळसा, ०.२१ दशलक्ष टन लोह व स्टील, ०.५८ दशलक्ष टन सिमेंट, ०.८६ दशलक्ष टन कंटेनर आणि १.१० दशलक्ष टन खत, पीओएल इत्यादींचा समावेश असलेले इतर मालवाहतूक लोडिंग केली आहे.

एप्रिल ते मे २०२१ या काळात मध्य रेल्वेने १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी २०२० मधील याच कालावधीतील ७.५५ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत ६६.५ टक्क्यांनी जास्त आहे. मध्य रेल्वेतील १२.५७ दशलक्ष टन मालवाहतुकीत मुंबई विभाग २.८३ दशलक्ष टन, भुसावळ विभाग ०.९५ दशलक्ष टन, नागपूर विभाग ७.३० दशलक्ष टन, पुणे विभाग ०.२९ दशलक्ष टन आणि सोलापूर विभाग १.२० दशलक्ष टन लोडिंगचा समावेश आहे.

रेल्वेतील मालवाहतूक अतिशय आकर्षक करण्यासाठी रेल्वेमध्ये अनेक सूट / सवलतीही दिल्या जात आहेत. वेगवान मालवाहतुकीसाठी केलेल्या सुधारणेमुळे सर्व भागधारकांच्या पैशांची बचत होते. वर्षभरात मालवाहतुकीचा वेग जवळजवळ दुप्पट झालेला आहे.

During the Corona period Central Railway carried 632 million tonnes of freight in May 2021