शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ED आणि CBI ची एकत्रितरित्या धाड

यापूर्वी देखील आमदार प्रताप सरनाईक यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यात आली होती. परंतु नंतर हा तपास काही कारणास्तव थंडावला होता. मात्र, आता प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्टवर ईडी आणि सीबीआयने धाड टाकली असून या प्रकरणात नवी माहिती पुढे येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

    पुणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्टवर ईडी आणि सीबीआयने एकत्रितरित्या धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले असून सध्या शोधसत्र सुरू आहे.