iqbal mirchi

पहिल्या टप्प्यात मुंबईतील सीजे हाऊसच्या तीसऱ्या आणि चौथ्या मजल्यासह भारतातील १५ मालमत्ता आणि सहा बँक खात्यांमध्ये जमा केलेले १.९ करोड रुपये जप्त करण्यीची परवानगी मागितली आहे.

मुंबई : ईडीने मुंबईच्या विशेष न्यायालयात कुख्यांत गुंड इक्बाल मिर्चीच्या (Iqbal Mirchi ) कुटूंबीयांतील ३ सदस्यांना आर्थिक गुन्हेगार आणि फरारी घोषित करण्याची विनंती केली आहे. ईडीने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर इक्बाल मिर्चीच्या कुटूंबातील ३ सदस्यांवर मुंबईमधील विशेष पीएमएलए कोर्टाने ( Special court ) अजामीनपात्र वॉरंट (non-bailable warrant ) जारी केले आहे.

ईडीने टविट करत याची माहिती दिली आहे. कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीचा मृत्यू २०१३ मध्ये झाला आहे. तसेच फरार, गुन्हेगार फौजदारी कायद्याच्या कलम १२ सह कलम ४ अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय जुनैद इकबाल मेमन, आसिफ इक्बाल मेमन (मिर्चीचा मुलगा) आणि हजरा मेमन यांना फरारी, आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच ईडीने सांगितले की कायद्यानुसार त्यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देण्यात यावी.

ईडीने म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यात मुंबईतील सीजे हाऊसच्या तीसऱ्या आणि चौथ्या मजल्यासह भारतातील १५ मालमत्ता आणि सहा बँक खात्यांमध्ये जमा केलेले १.९ करोड रुपये जप्त करण्यीची परवानगी मागितली आहे. ईडीला फ्यूझिव्ह इकॉनॉमिक गुन्हे कायद्यांतर्गत पूरक अर्ज दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे.

ईडी मिर्ची, तिचे कुटुंब आणि इतरांविरूद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली चौकशी करत आहे आणि या प्रकरणात आतापर्यंत ७९८ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.