ED

फिल्म प्रोड्युसर(Film Producer) आणि बिल्डर(Builder) युसूफ लकडावालाची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

    मुंबई : फिल्म प्रोड्युसर(Film Producer) आणि बिल्डर(Builder) युसूफ लकडावाला(Yusuf Lakdawala) याच्या बाबतीतील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. युसूफ लकडावालाची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. आज युसूफला ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात आणलं.

    युसूफ लकडावाला याच्या विरोधात EOW ने गुन्हा दाखल केला आहे. हाच गुन्हा आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नोंदवून तपास सुरू केला आहे. लकडावाला याच्यावर हैदराबादच्या निजामाची खंडाळा येथील ५० कोटी रुपयांची जमीन लाटल्याचा आरोप आहे.