graphic

ईडीने अनिल देशमुख(Ed Action On Anil Deshmukh) यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख(Rushikesh Deshmukh) यांना समन्स पाठवला. यामध्ये चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. यावरुन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाल्याची दिसत आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख  यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि पीए कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना ईडीने अटक केली होती. त्यात आता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांना ED ने समन्स बजावला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारीच ईडीने ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठवला होता. यामध्ये चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. यावरुन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाल्याची दिसत आहे.

    अनिल देशमुखांना १०० कोटी वसुली प्रकरण भोवणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला. याप्रकरणी बार मालकांनी दिलेला जबाब तसेच सचिन वाझे याच्या जबाबानंतर ईडीने अनिल देशमुखांच्या निकटवर्तीयांना अटक केली आहे.

    ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यांत परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारतां येत नाही.

    एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा.