जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अनिल परब यांना ईडीची नोटीस

एकीकडे या यात्रेची सांगता होत आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस येत आहे. अशी माहिती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे.

    मुंबई – राज्यामध्ये एकीकडे भाजपची जन आशीर्वाद यात्रा आहे. या जन आशीर्वाद यात्रेची सांगता होते आहे. जन आशीर्वाद यात्रा सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद रंगला. यानंतर राण्यांचे अटक आणि जामीनावर सुटका देखील झाली. एकीकडे या यात्रेची सांगता होत आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस येत आहे. अशी माहिती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे.

    संजय राऊत यांचे ट्विट

    संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र.”