अनिल परब यांना ईडीची नोटीस; भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की…

  मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. अनिल परब यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

  अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाली आहे किंवा नाही, याची मला काहीच कल्पना नाही. ईडी असो वा सीबीआय हे त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. अशी सावध प्रतिक्रीया फडणवीसांनी दिली.

  दरम्यान अनिल परब यांना ईडीची नोटीस परब यांना सचिन वाझे प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

  काय आहे प्रकरण?

  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अनिल परब यांनी ईडीने नोटीस बजावली असून मंगळवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन वाझेनं त्याच्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतले होते. परब यांनी बीएमसी ठेकेदारांची माहिती दिली होती. याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

  परब काय म्हणाले?

  संध्याकाळी ईडीकडून नोटीस मिळाली आहे. पण ही नोटीस नेमकी कशासाठी हे वकील तज्ञ समिती समवेत चर्चा करून उत्तर देईल. पण हे सूडबुद्धीने केले का यावर मला आता बोलायचे नाही, मला नोटीस आली त्याला उत्तर देईल. नोटीस बघून त्याला कायदेशीर उत्तर देण्यात येईल, असं सांगत परब यांनी कायदेशीर लढा देणार असल्याचं स्पष्ट केलं.