ED पीडा टळेना! लूक आऊट नोटीस किंवा अजामीनपात्र वॉरंट काढणार; अनिल देशमुख यांनी प्रेसनोटद्वारे स्वत: माडली भूमिका

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की मी कायद्याचे पालन करतो. मी जेव्हा हवे तेव्हा ईडीला सामोरे जाईन. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पुढे जाईन. माझी याचिका कोर्टाने दाखल करुन घेतली आहे, असे देशमुख यानी म्हटले आहे. जोपर्यंत आमचे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत आम्हाला समन्स पाठवले जाऊ नये. आम्हाला सवलत द्यावी. आमच्यासाठी अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयातही जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला समन्स पाठवले जाऊ नये, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. मात्र अनिल देशमुख यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस किंवा अजामीनपात्र वॉरंट काढण्याच्या तयारीत ईडी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने या बाबत कारवाई करण्याआधीच अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत भूमिका स्पष्ट केली आहे.

    अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की मी कायद्याचे पालन करतो. मी जेव्हा हवे तेव्हा ईडीला सामोरे जाईन. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पुढे जाईन. माझी याचिका कोर्टाने दाखल करुन घेतली आहे, असे देशमुख यानी म्हटले आहे. जोपर्यंत आमचे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत आम्हाला समन्स पाठवले जाऊ नये. आम्हाला सवलत द्यावी. आमच्यासाठी अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयातही जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला समन्स पाठवले जाऊ नये, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.

    न्यायालय निकाल देईल तो मान्य

    त्यांनी म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयात आमची याचिका दाखल आहे, त्याची सुनावणी प्रलंबित आहे, हवाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. त्यात आमची याचिका जोडली गेली आहे. त्यामुळे न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. अनिल देशमुख यांना पहिले समन्स २५ जून रोजी पाठवण्यात आले. त्याला अनिल देशमुख यांनी उत्तर दिले की आपल्या विरोधात दाखल गुन्ह्याची आपल्याला प्रत देण्यात यावी. आपल्या विरोधात काय पुरावे आहे त्याची माहिती देण्यात यावी, असेही अनिल देशमुख यांचे म्हणणे होते. त्यांनी आपण ७२ वर्षाचे आहोत. आपल्याला अनेक आजार आहेत. सध्या कोविडचा काळ आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपली ऑनलाईन चौकशी करावी, असेही म्हटले होते. आता पुन्हा आपण ऑनलाईन चौकशीला तयार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

    तीन महिन्यात पाच समन्स

    त्यानंतरही त्यांना २६ जून रोजी देऊन समन्स पाठवून आठवड्याभरात म्हणजे ३जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होतेत्यानंतरही ते हजर राहिले नाहीत तेंव्हा ५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथ्यांदा समन्स ३० जुलै रोजी पाठवून २ ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आले. त्यानंतर १८ ऑगस्टला पाचवे समन्स हजर राहण्यासाठी ईडीने सांगितले होते. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी न जाता त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवले होते.