ईडीची 12 ठिकाणी छापेमारी; मुंबई, अहमदाबाद, नागपुरातही कारवाई

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने देशमुखांच्या सहा नीकटवर्तीयांवर फास आवळला आहे. ईडीने गुरुवारी मुंबई, अहमदाबाद, नागपूरसह तब्बल 12 ठिकाणी छापेमारी केली. ज्या व्यक्तींकडे झाडाझडती घेण्यात आली ते सर्व देशमुख कुटुंबीयांशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये संचालक आहेत.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने देशमुखांच्या सहा नीकटवर्तीयांवर फास आवळला आहे. ईडीने गुरुवारी मुंबई, अहमदाबाद, नागपूरसह तब्बल 12 ठिकाणी छापेमारी केली. ज्या व्यक्तींकडे झाडाझडती घेण्यात आली ते सर्व देशमुख कुटुंबीयांशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये संचालक आहेत.

    ईडीने देशमुखांच्या लहान मुलाच्या अनेक कंपन्यामंध्ये संचालकपदी असलेल्या स्नेहल अजित पटेल यांच्या अहमदबाद येथील कार्यालयाची व घराची झाडाझडती घेतली. या छापेमारीत ईडीच्या हाती काही डिजिटल रेकॉर्ड आणि महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले आहेत. त्या आधारावर आता पैशांच्या देवाणघेवाणीचीही चौकशी केली जाणार आहे.

    काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी देशमुख कुटुंबीयांची कंपनी राशी डीलकॉम प्रायव्हेट लिमिटेडद्वारे 9.82 कोटींचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी ईडीने चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी 20 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 8 पानांचे पत्र लिहून देशमुखांनी मुंबईतील 1750 बार आणि रेस्टोरेंटकडून 40-50 कोटीं रुपयांसह दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझेला दिले होते, असा गौप्यस्फोट केला होता. या प्रकरणी सीबीआयनेही देशमुखांविरोधात एफआयआर नोंदविला आहे.