अनिल देशमुखांच्या वडिलोपार्जित घरावर ईडीची धाड; बारचालकांकडून कोट्यावधीची वसुली केल्याचा ईडीचा दावा

ईडीने 16 जुलै रोजी अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती दिली होती. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील 1 कोटी 54 लाख रुपयांचा फ्लॅट आणि 2 कोटी 67 लाख रुपये किंमतीची रायगडच्या उरणमधील जमीन यांचा समावेश आहे. देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या 4.70 कोटी रुपये जमा केले. तसेच, दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून त्यांनी 4.18 कोटी रुपये जमवले असून ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचं भासवले, असे ईडीकडून सांगण्यात आले होते.

    नागपूर : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत सतत वाढ होत असल्याचे दिसत आहे. रविवारी सकाळी देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. सकाळी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीच्या अधिकाऱ्यांचे एका पथकाने देशमुख यांच्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली. देशमुख कुटुंब हे सध्या घरी नसून बाहेरगावी गेल्याचे समजते. या छाप्याची माहिती ईडीने स्थानिक पोलिसांनी दिलेली नव्हती. देशमुख यांच्या बंगल्याबाहेर सीआरपीएफचे काही जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, देशमुख यांचे काम पाहणारे त्यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्राने दिली.

    सीआरपीएफच्या सुरक्षेत कारवाई

    रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ईडीचे पथक सीआरपीएफ जवानांसह देशमुख यांच्या दोन्ही घरी दाखल झाले होते. कारवाईदरम्यान सीआरपीएफने घराला वेढाच टाकला होता. रविवारी सकाळी ईडीची दोन पथके नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील निवास्थानी दाखल झाली. वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर असून शेतीही आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर अनिल देशमुख यांचे समर्थक संतप्त झाले असून, सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

    मालमत्ता जप्त