bhavna gawli

खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED Summons To MP Bhavana Gawali) अर्थात ईडीने समन्स पाठवलं आहे.

    मुंबई : शिवसेनेच्या(Shivsena) यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED Summons To MP Bhavana Gawali) अर्थात ईडीने समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचे निकटवर्तीय असलेल्या सईद खान (Saeed Khan) यांना ईडीने आधीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने खासदार गवळी यांना ४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट को ऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं ४३.३५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्या एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र ती कंपनी सुरुच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसाच आरोप करण्यात आला आहे.

    भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून ७.५ कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला ७.९ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

    मनी लाँड्रींग प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती.  त्यांना ईडी कोर्टाने १ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. एनजीओचं व्यावसायिक कंपनीत रुपांतर केल्याचा आरोप खान यांच्यावर आहे.