अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ‘ईडी’ची लूकआऊट नोटीस

खंडणी वसुली घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. तसेचं देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल.'

    मुंबई : खंडणी वसुली घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. ईडीने आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाच समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र, पाचहीवेळा देशमुख यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता.

    मात्र, आता अनिल देशमुख यांना ईडीने सहावे समन्सदेखील बजावले आहे. पण त्याआधीच त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांना ‘लुकआऊट’ नोटीस बजावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत.

    तसेचं देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल.’