ईडीच्या समन्सला सर्वोच्च न्यायालयात आव्हान निकाल आल्यानंतर स्वत: ईडीसमोर जबाब नोंदवायला जाणार; माजी गृहमंत्री देशमुख यांचा खुलासा

सक्तवसुली संचलनालय ईडीच्या संपर्कात अनिल देशमुख नसल्याची वृत्त माध्यमांतून प्रसिध्द झाल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यानी खुलासा केला आहे की, मला ईडीचे समन्स आले होते. त्या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे.

    मुंबई : सक्तवसुली संचलनालय ईडीच्या संपर्कात अनिल देशमुख नसल्याची वृत्त माध्यमांतून प्रसिध्द झाल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यानी खुलासा केला आहे की, मला ईडीचे समन्स आले होते. त्या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे.

    जमीन तीनशे कोटीची दाखवून गैरसमज

    त्यांनी खुलासा केला आहे की, माझ्या परिवाराची अंदाजे ४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने २००६ मध्ये २ कोटी ६७ लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. पण काही वर्तमानपत्रात २ कोटी ६७ लाख रुपयांची जमीन तीनशे कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे.

    नागपुरातील काही मालमत्ताही सील

    अनिल देशमुख यांच्या मुंबई वरळीतील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा प्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. दुसरीकडे उरणजवळील धुतूम गावात देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांच्या कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीतील काही फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत २ कोटी ६७ लाख रुपये आहे. त्याचबरोबर देशमुख यांची नागपुरातील काही मालमत्ताही सील करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हवाला प्रकरणात देशमुख यांच्या विरोधात ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.