भविष्यात शिक्षण, नोकरीतुनही आरक्षण काढणार; धनगर समाजाची फसवणूक केल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचा मेळावा पंढरपुरात घेण्यात आला होता. त्या वेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आरक्षण न देता धनगर समाजाची फसवणूक करण्यात आली. अशीच फसवणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व आताचे सत्ताधारी पक्ष करीत आहेत.

    पंढरपूर : आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. पंढरपूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप या पक्षांनी धनगर समाजाला उमेदवारी नाकारून प्रस्थापितांना तिकीट दिले आहे. त्यामुळे धनगर समाजाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मधुकर मोटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना निवडून आणावे. बिरप्पा मोटे हे धनगर समाजाचे असून ते निवडून आल्यास धनगरांच्या प्रश्नांना वाचा फोडतील. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते विधान सभापोट निवडणूक प्रचारात बोलत होते.

    माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचा मेळावा पंढरपुरात घेण्यात आला होता. त्या वेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आरक्षण न देता धनगर समाजाची फसवणूक करण्यात आली. अशीच फसवणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व आताचे सत्ताधारी पक्ष करीत आहेत.

    आरक्षण देतो असे सांगितले. मात्र गेली पाच वर्षे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आता एकटा पडला आहे. असे वक्तव्य ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. धनगर समाजाला सध्या ओबीसीचे आरक्षण मिळत आहे. त्यांचे आरक्षण का काढून घेतले जात आहे. त्याचे कारण म्हणजे जुन्या वर्णभेद प्रमाणे हे शूद्र आहेत व त्यांना सत्ताधारी होऊ द्यायचे नाही, त्यामुळे हा सर्व प्रकार चालू असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.