शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

 

माझ्या तपासणी दरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी, सुरक्षित राहा, काळजी घ्या, असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.