राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचं भिजत घोंगड, अद्याप काही ठरलं नसल्याची शिक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्यात शाळा सुरु करण्याबाबत अजूनही निर्णय(Decision About School Repoening In Maharashtra) झालेला नाही, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikawad) यांनी जाहीर केले आहे.

    मुंबई :  राज्यात शाळा सुरु करण्याबाबत अजूनही निर्णय(Decision About School Repoening In Maharashtra) झालेला नाही, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikawad) यांनी जाहीर केले आहे. टास्क फोर्ससोबत (Task Force Meeting For Schools)शाळांसंदर्भात बैठक झाली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. शाळा नेमकी कधी सुरू करावी याबाबत ही बैठक असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

    वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, टास्क फोर्ससोबत पुन्हा लवकरच बैठक होईल .शाळांसंदर्भात मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळा कधी सुरु होणार या प्रतीक्षेत सध्या विद्यार्थी आहेत. मात्र राज्य सरकार इतक्यात शाळा सुरु करेल असे चित्र सध्या तरी दिसून येत नाही. शाळा सुरु करण्याबाबत आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.