रेमडेसिविर व टॉसिलीझुमॅब कोविडसाठी परिणामकारक; केईएम रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्कर्ष

    मुंबई : केईएम रुग्णालयातील वैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात रेमडेसिविर किंवा टॉिसलीझुमॅब इंजेक्शन घेणारे गंभीर कोविड बाधित रुग्ण लवकर बरे होत असल्याचे समाेर आले आहे.

    केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी रेमडेिसविर तसेच टॉसिलीझुमॅब इंजेक्शन घेणाऱ्या ५२१ रुग्णांचा अभ्यास केला. कोविड झालेल्या रुग्णांना एक अथवा दोन्ही इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या जगण्याचे प्रमाण हे ६४ टक्के दिसून आले. तर ज्या रुग्णांनी दोन्ही पैकी एक ही डोस घेतला नाही, त्या रुग्णांतील मृत्यूचे प्रमाण हे ३४ टक्क्यांपर्यंत दिसले. रेमडेसिविर घेणाऱ्या रुग्णांमध्ये घरी जाण्याचा दर हा ६६ टक्के होता तर टॉसोलीझुमॅब औषध घेणाऱ्या रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण हे ८० टक्के होते. ज्या रुग्णांनी दोन्ही डोसची मात्रा घेतली होती त्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ४७ टक्के होते. तसेच २३ मार्च ते ३१ मे २०२० च्या दरम्यान ज्या रुग्णांना कोविडवरील प्रायोगिक औषध उपलब्ध झाली नाहीत, अशा २१४ विविध क्लिनिकमधील रुग्णांचा अभ्यास देखील यादरम्यान करण्यात आला.

    ज्या रुग्णांना औषधांचा एक किंवा दोन्ही डोस दिले गेले, अशा रुग्णांपैकी ३३४ म्हणजेच ६४ टक्के रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर केवळ ५ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करावा लागला. डॉक्टरांनी केलेल्या या अभ्यासाचा निष्कर्ष १ जुलैच्या ‘जर्नल्स ऑफ दी असोसिएशन ऑफ फिजीशियन्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

    गंभीर रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य

    ५५ वर्षापेक्षा कमी वयाच्या रुग्णांना डिस्चार्ज होण्याची शक्यता जवळपास तीनपट जास्त आहे. मास्क किंवा इतर सुरक्षा साधनांचा वापर करणाऱ्या रुग्णांच्या श्वासोच्छ्वावास प्रक्रिया ही ३४ पट जास्त आहे, असे डॉ. सुश्रुत इंगवले यांनी सांगितले. यावर डाॅ. अमित भोंडवे, डॉ. वसीम खोत आणि इतर नऊ जण सदर अभ्यासावर काम करीत आहेत. टॉसिलीझुमॅब, योग्य वेळी योग्य रूग्णांना दिल्यास गंभीर रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होते आणि रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज देखील लागत नाही. जुन्या आणि गंभीर रूग्णांमध्ये याचा समान परिणाम दिसून आला नाही. औषध घेण्यापूर्वीच दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्या रूग्णांची तब्येत सुधारू शकत नाहीत, असे डॉ. विशाल गुप्ता म्हणाले.