मुंबईत अडीच लाख नागरिकांमध्ये आहेत ८ हजार सुपर स्प्रेडर कोरोना पॉझिटीव्ह, पालिकेने केले क्वारंटाईन

मुंबई पालिकेच्या आराेग्य विभाग(health department) मुंबईकरांचे(mumbai) स्क्रीनिंग व काेविड चाचणीवर अधिक भर देत आहे. या माेहिमे अंर्तगत मागील १८ दिवसात पालिका आराेग्य विभागाने शहर व उपनगरात तब्बल अडीच लाख मुंबईकरांची चाचणी केली, यात ८ हजार सुपर स्प्रेडर कोविड पाॅझिटिव्ह(8000 super spreader in mumbai) सापडले आहेत. या सुपर स्प्रेडरना आराेग्य विभागाने क्वारंटाईन करत प्रसार थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

नीता परब, मुंबई : मुंबईत काेराेना रुग्णांची संख्या अलीकडेच घटत असल्याचे समाेर येत आहे. याचबराेबर काराेनाची दुसरी लाट येणार असल्याचे संकेतही आराेग्य विभागाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिका आराेग्य विभाग मुंबईकरांचे स्क्रीनिंग व काेविड चाचणीवर अधिक भर देत आहे. या माेहिमे अंर्तगत मागील १८ दिवसात पालिका आराेग्य विभागाने शहर व उपनगरात तब्बल अडीच लाख मुंबईकरांची चाचणी केली, यात ८ हजार सुपर स्प्रेडर कोरोना पाॅझिटिव्ह(8000 super spreader in mumbai) सापडले आहेत. या सुपर स्प्रेडरना आराेग्य विभागाने क्वारंटाईन करत प्रसार थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईकरांनी मनसाेक्त खरेदी केली शिवाय नातेवाईकांकडे ये-जा केली, या दरम्यान काेविड रुग्णांची संख्या वाढली असल्याचेही समाेर आले. ज्यामुळे पालिका आराेग्य विभागाने काेविड चाचणीवर अधिक भर दिला. यात विशेष करुन समूहात राहणारे नागरीकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यात फेरीवाले, पाेलीस विभाग, बेस्ट व राज्य परीवहन मंडळाचे कर्मचारी, सॅनिटाइजर कर्मचारी, सफाई कामगार यांचा समावेश आहे. १५ नाेव्हेंबरपासून आजमितीपर्यंत तब्बल अडीच लाख नागरिकांची काेराेना चाचणी करण्यात आली, यात आठ हजार नागरिक पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.

काेण आहेत सुपर स्प्रेडर ?
ज्या नागरिकांचा थेट संपर्क इतर सर्वसामान्य नागरिकांबराेबर हाेत आहे, असे सुपर स्प्रेडर म्हणून पाहिले जाते. यात सुपर स्प्रेडर भाजीवाला, दूधवाला, फळविक्रेता, बेस्ट कर्मचारी, एसटी कर्मचारी यात चालक-वाहक, पाेलीस आदींचा समावेश असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

१५०० नागरिक पाॅझिटिव्ह
मागील १८ दिवसात तब्बल ८ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण शहर व उपनगरात सापडले आहेत. या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या सुपर स्प्रेडरना काेविड केअर केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर उर्वरित ६५०० रुग्णांमध्ये काेरोना लक्षणे नसल्याने त्यांना हाेम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

०.७५ टक्के पाेलीस काेरोना संक्रमित
मागील १८ दिवसात ३० हजार पाेलीसांची काेराेना चाचणी करण्यात आली असून यात ०.७५ टक्के पाेलीस काेविड संक्रमित असल्याचे पालिका आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.

बेस्टच्या पाच डेपाे कर्मचाऱ्यांची काेरोना चाचणी
मागील १८ दिवसात पाच बेस्ट डेपाे मध्ये कार्यरत असलेले चालक व वाहक व इतर कर्मचाऱ्यांची कराेना चाचणी करण्यात आली असल्याचे माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तसेच इतर बेस्ट डेपाेतील कर्मचाऱ्यांची चाचणी येत्या काही दिवसात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.